भीम जयंती कविता
भीम जयंती कविता
1 min
15.3K
सडा घालताना अंगणी पाणी
आठवते चवदार तळे लढाई हक्काची.
रांगोळी काढता सुरेख ती दारी
काळाराम मंदिर लढा होता समानतेसाठी.
सुटाबुटात राहताना छाती फुगते भारी
भीमाची ती पुण्याई साऱ्या समाजावरी.
तोरण पताका कशी नटलीय् ही धरणी
निळी निळाई आकाशी बुध्द हसतोय गाली.
भारताची नवी पहाट संविधानात लिहिली
अशी विश्वात शोभते भीम जयंती साजरी.
