भेट
भेट
तुझी नि माझी भेट
होता होता राहिली
अन् ती सल
आयुष्यभर बोचत राहिली
ते पत्रात रंगवलेले क्षण
कागदावरच राहिले
बोलायचं होतं खूप काही
पण मनातच राहिले
ती नजरेची चुकामुक
सर्वांसमोर झाली
पण एकांतात मात्र
जपता नाही आली
खूप सारी स्वप्नं
तुझ्याबरोबर पाहिली
पण प्रत्यक्षात मात्र
उतरवता नाहीत आली
मार्ग झाले आपुले
जरी आता विभक्त
तुला एकदा पाहण्याची
लालसा आहे फक्त