STORYMIRROR

Rajesh Sabale

Others

2  

Rajesh Sabale

Others

भेगाळलेल्या जमिनीची कथा

भेगाळलेल्या जमिनीची कथा

1 min
13.6K


भेगाळल्या जमिनीची, काय सांगावी महती।

वर आकाशाच छत, खाली काळी काळी माती।। 

 तापलेली जमीन सारी, आता भेगाळत गेली।

अन करपावी भाकर, तशी पीक करपुन गेली।। 

वाट पाहून पावसाची, विहिरी, तलाव आटले|

पाणी डोळ्यात साठले, जणू काळीज फाटले|| 

शेत जमिनीची माया, मुला-बाळांना पोसते|

पावसाच्या भेटीसाठी, धरा उन्हान तापते|| 

 काळ्या जमिनीला, ऊन-पावसाची भूख।

जवा येईल पाऊस, तवा मिळायचे सुख।| 

 कधी तरी ऊन-वादळात येतो, पावसाचा फेरा।

चिंब भिजवीत जातो, काळ्या मातीतल्या पोरा||

 


साहित्याला गुण द्या
लॉग इन