STORYMIRROR

काव्य रजनी

Others

3  

काव्य रजनी

Others

भावना भक्त

भावना भक्त

2 mins
11.7K


माझ्या जीवा शिवा संगे

शेतकरी दादा झुले

त्यांच्या गळ्यातली माळ

कशी दिनरात डुले


माझी शाळा किती छान

होती भावनांची गर्दी

आता कसली ती हो शाळा

सगळी स्वार्थाची भरती


कधी भावना दाटली

उभी दारात माऊली

कशी लेकाची मग तिच्या

बघा माया हो आतली


करी लेकीचा तो लाड

करी देऊन चिऊचा घास

भावना काय त्या बापाची

लावी मायेची ती आस


दिला गायीलाही चारा

म्हणे शेतकरी दादा

भावना त्याच्याही दाटल्या

आली भाजीवर गदा


लेकुरवाळी बाळंतीण

कशी काळजीने झुरे

भावनांचा देते झोका

बाळा गाई गाई करे


कधी कुणाचे वाईट

करू नका आयुष्यात

भावना तुटल्या एकदा

जुळणार नाही मनुष्यात


आई माझी गं सुगरण

खरी आनंदाची खाण

तिच्या भावना जपून

भावंड राहतो आम्ही छान


भावना समजून मनीची 

राम गहिवरतो

अन् खारीच्या पाठीवर 

अलगद हात फिरवतो


कशी झाली रे किमया

माणूस गेला वाया

झाल्या भावनाही दुःखी

जेव्हा लेक नेती माया


सांज संध्याकाळी दिवा

लागे माझ्या अंगणात

गोठ्यातली गाय 

हंबरते भावनांत


सुदाम्याचे पोहे 

कृष्ण आनंदाने खातो

भावना मनीची जाणून

देव भाऊक रे होतो


उणीवा काढू नयेत

कोणाच्या, वाईटच खोड ती

स्वतःतील उणीव पाहावी

नक्कीच होईल भावनांची प्रगती


भावना प्रत्येकात असतात,

प्रयत्नांनी भरून काढाव्यात

आयुष्य जगताना आपण,

आनंदाच्या जागा शोधाव्यात


भावना माणसाला दुर्बल करते, 

न्यूनगंडही येतो कधी कधी

ओळखा उणीव सावरा स्वतःला,

एक संधी द्या कधीतरी

>


संगोपन करताना मुलांचे,

कोणतीच ठेवू नये उणीव

लेकरांनाही भावना असते,

ठेवा आई-वडिलांची जाणीव


भावना कशा सांगाव्यात, 

कशी करू त्यावर मात

दिवस रात्र एकच विचार

असताना सगळ्यात


एक जाणीव मनाचा कोपरा,

अडवून बसते नेहमीच

सारखे सारखे त्याचे स्मरण,

चांगले नाही कधीच


मुलगा असो व मुलगी

उणीव मानू नये कोणाचीच,

भावना सारखीच दोघांची

सारखीच करतात ना सलगी


आयुष्यात तुझ्या मी,

भावना जपून प्रेम केलं

म्हणूनच तर आपलं नातं,

चिरकाळ टिकलं


भावना जाणून ना घेतल्या तर

खटके उडतात एकमेकांत

त्यांच्याकडे डोळेझाक,

करावीच लागते संसारात


कसे गोकुळ नांदते

यशोदेचा कान्हा बाळ

भावना ठेवती जपून

देवकी मातेची नाळ


कसा वाडा चिरेबंदी

माझ्या मामाचा तो छान

घाली मायेची अंघोळ

भावनांचा ठेवी मान


भारतमातेला या

प्रणाम कोटी कोटी,

आम्ही जगू हीच भावना

मरुही देशासाठी


आनंदी कुणीच

नसते या जगात

भावना स्वार्थी होतात

लोक झुरतात मनात


किती शब्द ते बोबडे

कसे तान्हे बाळ रडे

भावना आईच्या त्या

आनंद चोहीकडे


देणगी देऊन देऊन

किती मंदिरे भरली

याच मंदिरासमोर

गरिबांची भावना पुरली


आईची ती माया

असते अंगणातली छाया

तिच्या भावनेचा पदर

असते घराची ती रया


स्वप्नांचा हिंदोळा 

आहे माझा बाप 

माझ्या भावनेचा राजा 

माझ्या काळजाची छाप


सावळा विठ्ठल रखुमाई संग

वारकरी टाकिती पाऊल आनंद

पंढरपुरी भावना झाली दंग

भजनात विठू माऊलीचा अभंग


Rate this content
Log in