STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Others

4  

Abasaheb Mhaske

Others

भास

भास

1 min
300


नकळत पावले चालू लागतात ...

जिथे आपण भेटलो होतो

तुझ्या आठवणींचा पूर येतो तेंव्हा ....

सूर्य मावळताना सागराला भरती येते 


अकस्मात अंधारून येते तेंव्हा

धो धो पाऊस कोसळेल वाटतं

तू चल निघूया ... म्हटल्याचा

का कुणास ठाऊक भास होतो


त्या आठवणींनी मी वेडापिसा होतो अन .. 

जीवघेणा प्रवास असह्य होतो 

बरंच काही सांगून जाते ही धरा ... 

अटळ सत्य नाकारून कसं चालेल ?


जेंव्हा मी उदास होतो ...

तुझ्या विरहाचे गीत गातो

सळसळणाऱ्या पानांमधून

तू आल्याचा भास होतो ...



Rate this content
Log in