बेट...
बेट...

1 min

201
समुद्रावरचं बेट
कधीच भेटत नाही
किनाऱ्याला...कारण,
त्याला असतो किनारा
स्वतःचा.
अथांग असूनही समुद्र
स्पर्श करू शकत नाही
बेटाच्या टोकाला...
तेवढाच एक बांध,
उधाणाच्या रोखाला.
आलीच भरती तर लाटाच
अभिषेक घालतात हर्षाने
हळवं एकटं मनही बेटाचं
सुखावतं खारट स्पर्शाने.
समुद्र आहे म्हणून तर
अस्तित्व असतं बेटाला
नाहीतर कशाला भेटलं असतं
वाळवंटातल्या रुक्ष दगडाला?