STORYMIRROR

Manisha Awekar

Others

3  

Manisha Awekar

Others

असहाय्य " ती "

असहाय्य " ती "

1 min
11.4K

संगीताच्या तालावर

पैंजणे रुणझुणती....

नर्तकी नाचे बेभान

चाले अब्रूचा खेळ


कुणी पदराशी चाळा

कुणी जाई अंगचटी......

लंपट वाहवा पुकारी

असे नाइलाज तिचा.....


कँबमधे तरुण कुमारी

 बसलेली अंग चोरुन......

कुणी हात टाकी अंगावर

होतसे भक्ष्य हरिणी.....


शेतात खुरपणारी माता

पाजी आपल्या पोरा....

मुकादम वखवखलेला

साहे बिचारी पोटासाठी....


ह्या कर्दनकाळांना नसते

स्थळाकाळाचेही भान.....

आता तर वयाचीही

सोडलीय त्यांनी चाड....

प्रौढा किंवा वयस्करही....

अगदी न उमललेली नाजूक 

बालिकाही चालते

त्यातच त्यांची वासना शमते


कलियुग आलं असं.....

वारंवार म्हटलं जातं

पण सुखाचं , निर्भय राज्य 

कधी येणार..........


ते मात्र अज्ञातच असतं


Rate this content
Log in