अर्थ नाही
अर्थ नाही
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
132
अर्थ नाही त्या शब्दांना
जिथे भावनांचा लवलेश नाही
अर्थ नाही त्या हसण्याला
जिथे आनंदाचा गंध नाही
अर्थ नाही त्या स्पर्शाला
जिथे आपुलकीचा रंग नाही
अर्थ नाही त्या सौंदर्याला
जिथे मनाची पवित्रता नाही
अर्थ नाही त्या प्रेमाला
जिथे ह्रदयाशी बंध नाही
अर्थ नाही त्या नात्याला
जिथे निःस्वार्थ भाव नाही
अर्थ नाही त्या जगण्याला
जिथे माणुसकीला थारा नाही