अंकगीत बालकविता
अंकगीत बालकविता
1 min
14.2K
एक लेखणी आंबेडकरांची
देशाचे संविधान लिहणारी
दोन व्यक्ती फुले घरातील
सांगती महती शिक्षणाची
तीन शब्द महत्वाची
प्रज्ञा, शील, करुणेची
चार आर्य सत्य जीवनाची
शिकवण गौतम बुद्धांची
पाच शीले आचरण्याची
जीवन सुखी करण्याची
षडरिपू आपल्या मधले
संपवू देऊ साथ त्या संयमाची
सात रंग इंद्रधनुचे
मौज घ्या आयुष्याची
आठ प्रधान शीवशाहीचे
रोवला मुहुर्त त्या लोकशाहीचा
नऊ आहे नऊवारीची
लोकधारा ही महाराष्ट्राची
दहा पारमीता सांगती
अंक गीत जीवन जगण्याची.
