STORYMIRROR

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Others

5.0  

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Others

...अन् त्याला बोनसाय केल

...अन् त्याला बोनसाय केल

1 min
602


कदंबाच्या झाडावर

मन आमच जडल

शोधा शोध करुन

एक रोपट घरी आणलं


मोठ्यात मोठी कुंडी बघुन

त्यात आणलेली चांगली काळी माती टाकली

आणलेल रोपट त्यात

पाणी टाकुन लावलं


रोज त्याला पाणी टाकताना

त्याच्या वाढीकडे लक्ष ठेवल

हळुहळू होणारी त्याची वाढ

आनंद देत गेलं


काही आठवड्यांनी

ते झप झप वाढत गेल

आनंद वाटला त्याच्या वाढीवर

मोठ्या मोठ्या हिरव्या पानांवर...


क्षणांत मन खटू झाल

त्याच्या नैसर्गिक वाढीसाठी

त्याने आपले मुळे

कुंडी फोडत जमिनीत खोलवर रुजवलेली पाहून


किसनाने गोपींसोबत

यमुने तीरी केलेल्या

ह्या झाडावरच्या

वाचलेल्या रासलीला डोळया समोरआल्या


स्वतःच्या छोट्याच घराच

अस्तित्व धोक्यात येणार

ह्या शंकेने

मन बैचीन झालं


मनावर दगड ठेऊन

त्याची मातीत रुजणारी मुळ

जागे अभावी

कुंडीपासुन कापुन टाकले


...अन् त्याला बोनसाय केल


झपाट्यानी होणारी वाढ

खुंटून टाकली

लाल केशरी सुरेख फुले

कधी येणार याची आस

बघत बघत रोज पाणी टाकत राहणार

त्याला जगवत राहणार!



Rate this content
Log in