अग
अग
साज ह्यो तूझा, आज येगळाच ग.
बाज मिरवतो कसा, बघ रुबाबात ग.
काळजी सतत, ध्यास माझ्या मनात ग.
लागता चाहूल, कस चोरून पाहतो ग.
कशी लाजतेस तू, जणू सोन्यावाणी ग.
जशी वाढते चमक, तशी उजळतेस ग.
काय मांडू तुला शब्दा, बघ कोड्या पडतो ग.
आता हसतो तसा, जश्या बेड्या पडल्या ग.
साथ झाली तू सोबत, अशी कायमची ग.
बघ सरल प्रवास, जोडीनं वाट चालू ग.
सार येईल समोर, जशी कुस बदल ग.
सामना होईन जोरात, थोडा धीर धर ग.
अशी समोर तू ये, तुझी नजर काढतो ग.
बघ भेटलीस तू, देवा पाया पडतो ग.