STORYMIRROR

परेश पवार 'शिव'

Others

5.0  

परेश पवार 'शिव'

Others

अबोली

अबोली

1 min
1.7K


हा चंद्र, चांदण्या अन, ही रात एकटी आहे..

ज्योतीविना दिव्याची, ही वात एकटी आहे..


ती माणसं कुठे गेली, होती जी तुझ्याच भवती?

पुसते माझी प्रतिमा, जी आरशात एकटी आहे..


बेफिकीर उधळून केली, ही प्रीत आजवर ज्यांनी..

त्या वेड्या आशिकांची जमात एकटी आहे..


त्या उद्ध्वस्त घरट्याभवती, एक पक्षीण रडते आहे..

पिले शोधत येतील तिजला, ती या भ्रमात एकटी आहे..


कैक घाव ओरखडे अन, ते कधीच भरले होते..

एक जखम कधीची सलते, उरात एकटी आहे..


घर बंदच असते हल्ली, बघ ते पाचोळ्याचे अंगण..

एक फुलते फक्त अबोली, दारात एकटी आहे.


Rate this content
Log in