आठवणींत जगण्याची सवय झाली आहे
आठवणींत जगण्याची सवय झाली आहे
1 min
56
तुझ्या आठवणींचे मोरपीस
गालावर अलगद फिरवून
क्षणिक आनंदात समाधान मानण्याची
आता मला सवय झाली आहे।। १।।
पावसाच्या पाण्यात चेह-यावरचे आसू
लपवण्याची कला मला आली आहे
तुझ्या सोबतीच्या भुतकाळात रमण्याची
आता सवय मला झाली आहे।। २।।
डोळे बंद करून रूप तुझे पाहण्याची
आता मला सवय झाली आहे
तुझ्या विरहात जीवन जगायची
आता मनाने तयारी केली आहे।। ३।।
