Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Abasaheb Mhaske

Others

3  

Abasaheb Mhaske

Others

आठवं वाणी बहिणाबाईची...

आठवं वाणी बहिणाबाईची...

1 min
7.1K


तुझ्या - माझ्या भांडणाला कारण कशास हवे ?

शोधतेस तू भांडण्याचे फंडे नवे - नवे ... 

बोललं तर म्हणतेस . बस्स झाली तुझी बडबड 

नाही बोललं तर आता का दातखिळी बसली तुझी ?

तू म्हणजे ना जगातलं आठवं आश्चर्य गिनीजबुकातून .. 

नेहमीच तयार असतेस भांडण्यास पदर खोसून 

तुम्हाला काहीच नाही जमणार म्हणतेस ...

काहीही झालं तरी मलाच दोष देतेस , अक्कल आपली पाजळतेस  ...  

तू घरात असतेस ना तेव्हा घरदार हसत - खिदळत   

नाहक तुझी कटकट ऐकतो ना तिथंच सारं नासत ...

घरभर दरवळ तुझी मलाही जाणवते पण ...

अखंड एकतारी भजन तुझं , जीव नकोसा करत ...

चालू असत तुझं जेव्हा मी होते म्हणून निभावलं 

एखादी असती तर केव्हाच गेली असती सोडून ..

तू जशी घरासाठी राबते तेव्हा मी हि करतोच ग सोबत तुला 

विचार कर थोडा ,.माझं सारं योगदान का व्यर्थच समजतेस  ?

मान्य आहे मला तुझी घालमेल , भविष्याची चिंता 

पण तू प्रत्येक गोष्टीत माझ्याच चुका शोधतेस ...

समजून घ्यावं कधी - मधी नेहमीच का ग तू रागावतेस ...

अशी कशी ग तू असून अडचण नसून खोळंबा ?

अग ! भांड्याला भांडे लागणारच , तू- तू , मी - मी होणारच 

भांडण -तंटे , रुसवे - फुगवे विसरून सारे गाऊया गाणे ...

आठवं वाणी बहिणाबाईची आरे - आरे संसार संसार ...

आधी हाताले चटके तवा मिळते भाकर ...


Rate this content
Log in