आठवांचा हिंदोळा
आठवांचा हिंदोळा
कधी अचानक मन
वेगे झुले झुल्यावरी
आठवांची वावटळ
मन वेडेपिसे करी (1)
रम्य बालपणातली
मजा वेड लावतसे
उष्टी चिंचा बोरे आवळे
खाल्ले अधाशासारखे (2)
शैशवानंतर आले
मुग्ध यौवन दालन
मनी गोड गुंजतसे
प्रिय व्यक्तीचे दर्शन (3)
घर संसार मध्यमा
पार पाडे कर्तव्यचि
संधीकाली हो कातर
दृष्टी दूर पैलतीरी (4)
भावनांचे आवर्तन
ललकारी टप्पा देतो
आठवांच्या झुल्यावरी
वावटळ शमवितो (5)
