आक्रोश
आक्रोश
भेदरलेला जीव
कंठात अडकले प्राण
जीव घेण्या जमली गर्दी
नाही शरीरात त्राण
खोटेचं दाखले, खोटेचं पंचनामे
अपराध्याला सोडून
निरपराध्याला पकडून आणले
डोईवरचं छप्पर गेलं
बहिणीची अब्रू गेली
कुटुंब उद्धवस्त झालं
लेकराबाळांची दैना झाली
दोन घास पोटासाठी
लेकरं भिकेला लागली
जीवनातून उठलो ज्यांच्यासाठी
त्यांनीच माझी नाचक्की केली
कडीमागून कडी जोडली आणि मग
संशयाची पाल चुकचुकली
बलात्कार करणारे गेले पळून
सुरक्षा शेवटी त्यांनाच मिळाली
न्याय मागण्या गेलो मी
तुरुंगाची कैद मला मिळाली
न केलेल्या चुकीची शिक्षा मला मिळाली
जगणे झाले दूर्भर,अब्रूची लक्त्तर झाली
आश्वासनावर ज्यांच्या विश्वास ठेवला
त्यांनीच माझा घात केला
साधासुधा मी सापडलो त्यांच्या तावडीत
केसाने गळा कापला
आक्रोश आता भरला उरात
संतापाने मी जळतो आहे
कपाळावरचा डाग पुसण्या
जीव माझा तडफडतो आहे
मनाचं हे आक्रदंन मी आता संपावणार आहे
खऱ्या गुन्हेगाराला शोधून आता मी
काढणार आहे
श्रीमंत झाला म्हणून काय
मोकळं रान मिळणार नाही
कायदा सर्वांसाठी एकचं आहे
पायवाटांना फाटे आता फुटणार नाही
गजामागे जोपर्यंत पाठवत नाही
स्वस्थ मी बसणार नाही
आक्रोश माझा तोपर्यंत
थंडगार मी होऊ देणार नाही
