STORYMIRROR

kishor zote

Others

2  

kishor zote

Others

आजचे शिक्षण ( सहाक्षरी )

आजचे शिक्षण ( सहाक्षरी )

1 min
2.9K


मराठी शाळांना

नावे ठेवतात

इंग्रजी शाळांचे

गोडवे गातात....१

फुकट शिक्षण

नाहीच किंमत

माध्यम इंग्रजी

घेतीय विकत.....२

मराठी संस्कार

जाती विसरत

विदेशी गोष्टींना

ते कवटाळत....३

वाचन लेखन

मुले करतात

अभिव्यक्त होण्या

मात्र झुरतात....४

आजचे शिक्षण

टाहो ते फोडत

आतल्या आतच

ते गुदमरत.....५


Rate this content
Log in