आई ( सहाक्षरी )
आई ( सहाक्षरी )
1 min
232
आई शब्द दोन
सामावले विश्व
प्रत्येकाचे असे
शब्दात त्या दोन...१
पाठीवर फिरे
प्रेमळ तो हात
दु:ख दूर सारे
पळती क्षणात....२
कोणतेच नाते
नसतेच घट्ट
स्वतः करी कष्ट
पुरवीते हट्ट.......३
एकेरी ती हाक
बोलतो तीच्याशी
नाळ जोडलेली
असते तीच्याशी....४
जगातील सुखे
घेतसी लोळण
आशिर्वाद रुपी
आईचा तो हात...५