आहे उदंड म्हणतो....
आहे उदंड म्हणतो....
1 min
670
आहे उदंड म्हणतो पाणी घरी नि दारी
रे माणसा असू दे पण वागणे विचारी!
नाहीच जर तळाशी या रांजणात काही
कामात कावळ्याच्या यावी कशी हुशारी?
पाण्यास घालतो जो वाया उगाच, त्याने
पाण्याविना करावी संपायची तयारी!
प्रत्येक थेंब त्याचा अनमोल फार आहे
प्रत्येक थेंब जपणे अपुली जबाबदारी!
याहून दुःख मोठे नाहीच कोणतेही
पाण्याविना दिसावी धरती भकास सारी!
देऊन काय द्यावे आता नव्या पिढीला?
घेण्या उद्या भरारी, द्यावी इमानदारी!
