STORYMIRROR

Renu Pillay

Tragedy

3  

Renu Pillay

Tragedy

पश्चाताप

पश्चाताप

1 min
272

चुकलेच ना माझे वेड्यासारखे तुझ्यावर मी खूप जीव लावले,

माझे सर्व जग मी तुलाच मानले,

चुकलेच ना माझे, मी तुझासाठी थांबले,

तू ही एक दिवस माझ्यावर प्रेम करशील असे समजत राहिले.


चुकलेच ते माझे तुझ्यासाठी अख्ख्या जगाशी मी भांडले,

त्रास केला स्वतःला इतकी मी रडले पण तुला मात्र कधीच फरकही नाही पडले.

तुझ्यासाठी मात्र नेहमी मी झुरतच राहिले,

चुकलेच की रे माझे, सारे जग तुला मानले,

सोबत आपण राहू असे स्वप्न पाहत राहिले..


सोडून नाही जाणार असे म्हणून,

एकेदिवशी सहज निघून गेलास

आयुष्याच्या वाटेवर हात सोडून दिलास...

मी मात्र तुझी आस लावत राहिले...

पण तुला माझे कधी प्रेमच नाही कळले.


चुकलेच ना माझे तुझ्यावर जीव लावले,

स्वतःला विसरून तुझ्यात वाहात राहिले.


Rate this content
Log in

Similar english poem from Tragedy