स्वप्नातले चाहुल
स्वप्नातले चाहुल
काल स्वप्नात माझ्या
सारे काही मनासारखे घडत होते,
माझ्या सोबत तो आणि त्याच्या सोबत मी होते.
त्याच्याकडे पाहता पाहता त्याच्याच नजरेत वाहत होते,
त्याच्या रंगात रंगून त्याचा मध्येच रंगले होते,
त्याच्या हाताचे स्पर्श माझ्या हाताला अलगद पणे लागले होते,
कसे काय जणू तेव्हा हळूच मी लाजले होते,
त्याचा डोळ्यात हरवून त्याचीच होऊन जात होते.
माझ्या सोबत तो आणि त्याच्या सोबत मी होते.
त्याच्यासोबत असण्याचे आनंद मनात दरवळत होता,
बोलताना तो त्याचा शब्दात मी हरवले होते,
त्याचीच होऊन त्याचा मध्ये अलगद गुंतून जात होते,
माझ्या सोबत तो आणि त्याच्या सोबत मी होते.
काल स्वप्नात माझ्या हे सारे काही घडत होते,
स्वप्न असून हे सगळे खरे मला वाटत होते...
माझ्या सोबत तो आणि त्याचा सोबत मी होते.
किती गोड स्वप्न होते है...किती आनंद मला वाटत होते..
त्याच्या स्वप्नात रंगून त्याचीच होऊन जात होते.

