STORYMIRROR

Renu Pillay

Romance Others

4  

Renu Pillay

Romance Others

सांग ना वेड्या मना

सांग ना वेड्या मना

1 min
181

लिहताना तुझा तो चेहरा मला आठवतो,

हसताना तुझा तो आभास मला सतावतो,

पण समोर तु आलास की बोलायला पण घाबरते,

ह्या वेड्या मना मी कसा करून सावरते...


आठवण आणि आठवण तुझीच मी काढते...

ह्या वेड्या मना मी कस करून सावरते।।


दिसतोस जेव्हा तू समोर तेव्हा हळूच मी लाजते,

मनातल्या मनात हळूच मी हस्ते

कसे ना कसे ह्या वेड्या मना मी कसे तरी सावरते,

आठवण मला अगदी तुझीच सतावते.


लिहताना तुझा चेहरा मी आठवते,

तुझ्या नजरेत मी स्वतःला शोधते.

तुझ्यात मी हरवून तुझीच होऊन जाते.


लांब जेव्हा असतोस..विचार एक सारखा मनात माझ्या रुजतो.


भेटशील ना पुन्हा...ह्या प्रीती च्या निसर्गात

चांदण्यांचा प्रकाशात...सुंदर फुलांच्या दरवळत्या सुगंधात.

दिसशील ना पुन्हा त्या ओल्या पावसाच्या थेंबात,

त्या सुंदर अश्या प्रीती ने मोहरलेल्या निसर्गात


हे मन कुठेच लागत नाही,तुला पाहिल्या शिवाय

राहवत नाही...

दिसतोस जेव्हा समोर तेव्हा आनंद मनात दरवळत राही.

कसे करून ह्या वेड्या मना मी सावरत राही।।


Rate this content
Log in

Similar english poem from Romance