ब्रह्मादिकां न कळे
ब्रह्मादिकां न कळे
ब्रह्मादिकां न कळे तें रुप सुंदर ।
गोकुळीं परिकर नंदाघरीं ॥१॥
रांगणां रांगतु बाळलीले खेळतु ।
दुडदुडां धांवतु गायीपाठीं ॥२॥
गौळणीचे घरीं चोरुनि लोणी खाये ।
पिंलंगतां जाये हतीं न लगे ॥३॥
एका जनार्दनी त्रैलोक्यां व्यापक ।
गाई राखे कौतुक गौळियांसी ॥४॥
