Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

बायको....!

बायको....!

1 min
489


बायको...!


बा बा रे ती

य  दाकदाचित भेटली तर

को णाला सांगू नको

    का हे पण विचारू नको...!

बा बा रे

य  दाकदाचित सोबत असेल तर

को णाला सांगायची सोय असत नाही

   ती बायको...!

बा पाची भरपाई

य  डीला पार पाडताना

को णतंही कारण लागत नाही

   ती बायको....•!

बा प आठवतो संसारात

य म यातना भोगताना

को णीच येत नाही मदतीला

    जेंव्हा ती उभी असते ती बायको....!

बा  र मध्ये ग्लासात दिसते

य दा कदाची चकण्यात तिखट लागते

को रण्या साठी दातात अडकते

   ती बायको....!

बा गेत फिरताना मागे ओढते

य ड्यात काढून मैत्रिणी समोर हसते

को णतीच इज्जत राखत नाही

   ती बायको....!

बा लात बाल समजते

य ड्यांच्या पंगतीत बसवते

को णताच मुलाहीजा ठेवत नाही

   ती बायको...!

बा प रे बाप मुलुख मैदान

य दकदाचीत बोफोर्स झक मारेल

को णतीच यंत्रणा उभी राहू शकत नाही

   अशी महामाया ती बायको...!

बा बांनो हा कल्पना विलास

य  दाकदाचीत झोंबेल पण

को णताच परिणाम जिच्यावर होणार नाही

   ती बायको....!

पण

बा रीक सारीक गोष्टींची काळजी घेणारी

य डयाला पदरी पडलं पवित्र झालं म्हणून

को णतीच तक्रार न करता 

   आजन्म सांभाळते ती बायको.....!

बा ज जीवनाचा राखणारी

य म यातना साहणारी

को णतेही धाडस शिरावर घेणारी

   आपल्यासाठी सदैव झटणारी ती बायको...!

अशा

बा प विभूतीला सलाम करत

य ड हिला विचारून सांगतो म्हणतं

को परापासून हात जीच्यासमोर जोडत

   ती बायको....!

बा यको साठी या दोन चार ओळी

य ड्या भोळयांनी कल्पिल्या त्या सर्व

को हिनूर यजमानांची 

   जी शान,जान ती बायको...!


Rate this content
Log in