Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

वाटतं काहीतरी..!

वाटतं काहीतरी..!

1 min
126


गुणगान भरपूर झालं

उदो उदो पण भरपूर झाला

दिवस वर्षातला एक

मोठ्या थाटात पार पडला


आवळ्याचा भोपळा

की भोपळ्याचा आवळा

देवच जाणे

पण सुशिक्षित आणि

सुसंस्कारित याचा

प्रश्न मनास पडला


शिकले सवरले

स्वतःच्या पायावर

उभे राहिले पण

दुसऱ्या साठी

पाय नाही जाहले

तर काय उपयोग..?


मी माझं माझ्यातून

बाहेर पडता आले नाही

तर काय उपयोग...?


कुसळ पाहुन जन्म सरला

मुसळ नाही दिसले तर

काय उपयोग...?


प्रकाश पाडला पण

बुड अंधारात असेल

तर काय उपयोग...?


माया ममता

गौरविली पण

आप्त पोरके असतील

तर काय उपयोग...?


भाग्य खुलले फुलले

पण सौभाग्य न उमजले

तर काय उपयोग...?


वाचले लिहिले

सांगितले प्रकाशित केले

पण अमलात आणता आले नाही

तर काय उपयोग..!


गीता वाचली पठण केली

सांगितली आणि पारायण केली

पण गीता जगलो नाही

तर काय उपयोग...?


स्वार्थ निस्वार्थ ,स्वातंत्र्य पारतंत्र्य

आचार स्वैराचार यातला फरक नाही कळला

तर काय उपयोग...?


शिकलो सवरलो मोठे झालो

पण लहानात लहान होता आले नाही

तर काय उपयोग...?


गगनास गवसणी घातली

उत्तुंग यश संपादले पण

जमिनीवर पाय नसतील

तर काय उपयोग...!


माणूस बनण्याच्या नादात

माणसातून बाजूला झालो

तर काय उपयोग...?


माणसात रहाताना

माणूस होता आले नाही

तर काय उपयोग...?


प्रश्न भेडसावत असताना

इतके कळले

मी तला मी गेला नाही

तर काय उपयोग ...?



Rate this content
Log in