कविता- शब्दांनो रुसू नका हो.
कविता- शब्दांनो रुसू नका हो.
1 min
14.3K
विनवण्या केल्या शतदा
केली आर्जवेही कितीदा
रुसणे जीवघेणे तुमचे
हात जोडु आता कितीदा...
नीर खोल जमिनीतुनी
वर येते उसळी मारुनी
असेच असते शब्दांनो
येणे तुमचे मनातुनी...
काय झाले अचानक नि
प्रवाह आतला तो आटला
रूसु नका हो असे तुम्ही
जीव किती तडफडला...
दुरावा सहन हाेत नाही
जीवास जीव हो लागला
नशीबवान खरा शब्दांनो
जिव्हाळा तुमचा लाभला
मदतीस या शब्दांनो तुम्ही
अजुन खुप सांगायचे आहे
वेदना दुःख्ख माणसाचे
माणसांना सांगायचे आहे ....!