स्त्री
स्त्री
खचणार नाही, थकणार नाही
येऊ देत संकटं, पाहीजे तेवढी
अन्याय कोणाचाही झेलणार नाही
बंड करण्याची आहे माझी तयारी
राजकारणाला बळी पडणार नाही
जे उगाचच पडलेत माझ्या पाठी
मोडुन जाईन पण वाकणार नाही
देऊ देत देणाऱ्याला त्रास कितीही
दुसऱ्यांच्या साच्यानुसार ढळणार नाही
आहे ,असेन ठाम मी माझ्या नियमांशी
मी माझा निर्णय बदलणार नाही
करू देत कोणी प्रयत्न केवढे ही
मी ,माझं धैर्य गळून पडणारच नाही
करू देत कितीही कारस्थानं कोणालाही
चुकीच्या अपेक्षांना खतपाणी घालणार नाही
आदर माझ्याकडला मागून मिळणार नाही
बोलणं कुणाचंही मनाला लावून घेणार नाही
भले ते शब्द घेऊन येवो धार तलवारीची
त्रासदायक गोष्टींना निवारा देणार नाही
मनातही ठेवेन विचार फक्त आनंददायी
मी माझा सन्मान खाली पडू देणार नाही
स्त्री माझं नाव, मीच भक्ती आदिशक्तीची
माझं अस्तित्व डगमगणार नाही
घर-ऑफिस,आहे समान हक्कांची कमाई
कोणत्याही त्रासाला अतिमहत्त्व देणार नाही
मिच शिल्पकार असणार माझ्या विचारांची
नको त्या विचारांमध्ये वाहावत जाणार नाही
माझ्याच हाती आहे खुश राहण्याची चावी