Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pandit Warade

Others

3  

Pandit Warade

Others

बळी पिकवतो मोती

बळी पिकवतो मोती

1 min
13.7K


बळी पिकवतो मोती

भूक जगाची भागते

त्याचसाठी दिनरात

त्याला राबावे लागते....१


भल्या पहाटे पहाटे

औत खांद्यावर घेतो

सर्जा राजाला घेऊन

बळी शेतामध्ये जातो...२


फाळ नांगराचा घुसे

काढे ढेकळाची रास

त्याच मातीत बसून

खातो भाकरीचा घास..३


उन्हा तान्हात राबतो

देह घामात भिजतो

राब राबून शेतात

बळी मोती पिकवतो....४


कधी दुष्काळाची धग

कधी येतो लाल्या रोग

बळी जगाचा पोशिंदा

नित्य भोगतसे भोग....५


काळ्या मातीच्या कुशीत

बळी सपान पेरतो

त्याला निसर्ग खोडीचा

चहू बाजूनं घेरतो.......६


Rate this content
Log in