बोटूक(बडबडगीत)
बोटूक(बडबडगीत)
1 min
583
इटुक मिटूक
चिंचेचं बोटूक.
बोटकाची चव
आबंटच भारी
एकटी झुलते
बोटकाची स्वारी
इटुक मिटूक
चिंचेचं बोटूक.
घेता नाव येते
तोंडाला पाणी
आपण म्हणूया
गमतीची गाणी
इटुक मिटूक
चिंचेचं बोटूक.