अंतरपाट
अंतरपाट
1 min
3.3K
अंतरपाट तो । शुभ्र वस्रावर ।
घालतो आवर । वधू वरा ॥ १॥
रेखिव स्वस्तिक कुंकू हळदीचे ।
असे मांगल्याचे । प्रतीक ते ॥ २॥
ना हो दृष्टादृष्ट । नव दाम्पत्याची ।
अंतरपाटाची । मर्यादा ती ॥ ३॥
अंतरपाटाची । जपूनीया पत ।
सांभाळावे नात । तुम्ही दोघे ॥ ४॥
घटिका समिप । आली जी मंगल ।
शुभ नी मंगल । सावधान ॥ ५॥
नका ठेऊ मनी । द्वेष्टाची ती गाठ ।
आनंदी पहाट । या जीवनी ॥ ६॥