Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

गोविंद ठोंबरे

Others

3  

गोविंद ठोंबरे

Others

बळ अंकुरी मातीचे

बळ अंकुरी मातीचे

1 min
7.4K


मी तुफान पिऊन उमलत आहे

डोंगर पाषाण मस्तकी पेलायला

अग्नी स्मशान करून फुलवत आहे

कुशीत काळ्या गाढ निजायला


अंकुर होऊन मी हिणवत आहे

त्या चांडाळ रातीस रडवायला

दिस ढगाळ माथ्यावर मिरवत आहे

माझ्या चरणाशी येऊन मुरायला


मी हिरव्या रंगात चिंब नहात आहे

लाल घामाचे मोती घडवायला

ओस पडल्या रानात जोमात आहे

माझ्या धन्याची लेक यंदा उजवायला


थेंब पिऊन प्राण नशेत आहे

साऱ्या दुःखाचं कारण झिंगवायला

माझ्या मिठीत गंध मातीचा आहे

सुख श्वासाचे अत्तर उधळायला


ताठ मानेने पाय धरून आहे

पुऱ्या रानात जोंधळे हसवायला

ढेकूळ ढालीचे अवजार घेऊन आहे

सैतान वाऱ्याशी सतत झुंजायला


Rate this content
Log in