का छेडले तु...
का छेडले तु...
1 min
5.5K
का छेडले तू तार हृदयाचे
उठतात येथून सूर वेदनेचे
जुनी पाकळी मी पुरे सुकलेली
सुगंधास आता झाली पोरकी मी
दिवस नाही आता पुन्हा फुलण्याचे, का छेडले तु तार हृदयाचे......
कधी एकदा मी आकाशात होतो
चांदण्यांप्रमाणे प्रकाशात होतो
धुंदीत नव्हते भय ग्रहणाचे
का छेडले तू तार हृदयाचे
घडीभर विसावा मग माती होईल
तुझ्याही कणांना पुन्हा गंध येईल
पडतील जेव्हा सडे पावसांचे
म्हणून छेडले मी तार हृदयाचे
का छेडले तू तार हृदयाचे
उठतात येथून सूर वेदनेचे