प्रवास
प्रवास
अखेरच्या क्षणी सोडून सारे
प्रवास आरंभिला रडती सारे
सोडून घरटे निघालो एकटाच
अनंतात विलीन होण्यासाठी
क्षुद्र जीवनात किती केले
हेवेदावे आपल्याच स्वार्थासाठी
किती झगडलो आयुष्यात साऱ्या
आपल्याच सुखासाठी
उभ्या आयुष्यात कित्येकांना
फसवले निव्वळ लाभासाठी
लाभ कसा हा? इतरांना फसवून
आज जाणीव कशासाठी?
लोभासाठी द्वेष उफळला
मत्सर जागा झाला
यंत्रासारखे धावत राहिलो
ओरबाडत सुखे सारी
अधाशासारखे मन माझे
कामना कधी न झाली पुरी
अतृप्त वासना फणा काढूनी
डसत राहिल्या क्षणोक्षणी
पूर्ण करण्या त्यांना सारे
जीवन खर्ची केले
जाणीव याची होता आज
हाती शिल्लक काय राहिले ?
आयुष्याचा मांडला ताळेबंद
केला हिशोब मनोमनी
खूप मिळवुनी सदा मात्र
अपूर्ण राहिलो अखेरी मी
पाप-पुण्याचा हिशेब मांडता
पुण्य आले कमी
ते मिळवण्यासाठी का आता
'राम ' म्हणावे मी