Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Varsha Chopdar

Others

3  

Varsha Chopdar

Others

वसंतोत्सव

वसंतोत्सव

1 min
577


रंगपंचमीचा गेला सण

रंगाची उधळण करत

गुढीपाडवा आला

मांगल्याची गुढी उभारत


वसंत ऋतूची चाहूलच

आहे खरी मनोहारी

निसर्ग अनुभवण्याचा

आनंद लय भारी


नसता पाऊस

सृष्टी ही बहरली

नववधूच्या शृंगारात

धरती ही नटली


कधी फेरीवाला

कधी जादूगार वाटतो

कधी पाहुणा

कधी 'अनंगदेवाचा प्रेषित' भासतो


नाद, रूप, रंग, गंध, स्पर्शून

धरेवर स्वर्ग निर्माण करतो

ऋतूश्रेष्ठ वसंत हा

ऋतूंचा राजा शोभतो


या आनंदसोहळ्यात

सामील होऊ या

रूपसगंधमय होऊनी

वसंतोत्सव साजरा करू या


Rate this content
Log in