सप्तरंगी जीवन ओळ..!
सप्तरंगी जीवन ओळ..!
एक ओळ
एका ओळीत एक गोष्ट सांगता येते
तिचे एक हृदय माझे आहे....!
दोन ओळी
दोन ओळीत दोनच गोष्टी सांगता येतात
तिचे दोन्ही प्रेमळ हात माझ्या हतात असतात..!!
तीन ओळी
तीन ओळीत तीन गोष्टी सांगता येतात
तिच्या दोन डोळ्याचे प्रेमळ बाण
माझे कोमल एकुलते एक हृदय घायाळ करतात..!!!
चार ओळी
चार ओळीची चारोळी
तिच्यासाठी माझी आरोळी
ती रचते माझ्या नावाची होळी
मी खातो रोज पुरणपोळी...!!!!
पाच ओळी
पाच ओळींची एकच माळ
जपत होते रोज सकाळ
तू माझी ,मी तुझा
तू राणी, मी राजा
काढू नको राणी आज रजा...!!!!!
सहा ओळी
सहा ओळींची कथा न्यारी
बायको माझी मला प्यारी
नित्य मागते नवी सारी
मी म्हणतो हळूच सॉरी
गोष्ट आहे ही खरी
जीवनात आमच्या नो हरी नो वरी..!!!!!!
सात ओळी
सात ओळींसाठी सात स्वर
सात ओळींसाठी सात रंग
ती वापरते वरचा स्वर
मला कळतो खालचा स्वर
ती उधळते लाल रंग
मी माझ्या रागात दंग
सप्त रंगाचा होता सफेद रंग ,माझा वाजतो मृदंग..!!!!!!!
अशी आमची जीवन कहाणी
सात ओळींची सात दिवसांची
इंद्रधनुषी सप्तरंगी आनंदाने
साथीत साथीने आनंदी जीवन जगण्याची
खरे पाहता समजून उमजून
जीवनात आनंदी राहण्याची.....!