Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Arun V Deshpande

Others

3  

Arun V Deshpande

Others

वर्तमान

वर्तमान

1 min
6.8K


भीषण वर्तमान जगतांना 

भविष्यात अजून काय ?

छापील वाचून रोजचे 

भरते मनास धडकी 

,त्याचे काय ?

नजरेसमोर असणार्या त्या 

समोरच्या छोट्या पडद्यावर 

घसा खरवडून देतात २४ तास वृतांत 

काय बोलतात ,कसे बोलतात ?

चीड आणणारी संवेदनाशून्यता 

असते शब्दा शब्दात 

वासनांध गिधाडे भवती 

घिरट्या सदा घालतात  

नाजूक घरटी पक्षीणीची

 राजरोस उध्वस्त होतात 

किती ही क्रूरता ,पाशवी वासना -सत्ता 

विसर पडतो यांना - ह्याही भगिनी-माता 

आतून हादरली ,बाहेरून बदलली 

माणसे बदलली - वागणूक बदलली 

वर्तमानातली भुतावळ असह्य झाली 

बदलेल का हे सारे ? कधी नि केंव्हा ..?

हीच चिंता वर्तमानी 


Rate this content
Log in