गुरू
गुरू
1 min
729
गुरू गुण नित्य गावे
गुरूला सदा भजावे।
गुरूपाद नित्य सेवा
गुरूला सदा स्मरावे।।१।।
गुरुविन जीवन अधुरे
गुरुमुळे ज्ञान पावे।
गुरुविन जीवनी तम
गुरूला शरण जावे।।२।।
गुरुस्पर्श तो सुखाचा
गुरुस्पर्श हा प्रीतीचा।
गुरुप्रेम लाभ जीवनी
गुरुमार्ग हा नीतीचा।।३।।
गुरुमार्गी चालताना
गुरुशी सश्रद्ध व्हावे।
गुरुज्ञान प्राप्तीसाठी
गुरुचे भजन करावे।।४।।
गुरू हाच ब्रह्म श्रेष्ठ
गुरू हाच विष्णू देव।
गुरूपरब्रह्म रूप आहे
गुरू हेच देवाधिदेव।।५।।