व्यथा शिक्षण वंचितांची
व्यथा शिक्षण वंचितांची
असतील आजही लोक असे भूवरी..
वाटे ज्यांना जावे मी शाळेत कधीतरी...
मिळवावे ज्ञान शिक्षकांकडून ...
ना पाहावे शिक्षणाकडे दूरुन...
चाळावीत पाने पुस्तकाची..
ना बनवावी होडी त्याची ...
गिरवावीत अक्षरे पाटीवर..
नको गोणीचे ओझे पाठीवर...
वाचावे धडाधड धडे...
ना बसावे फोडत खडे...
ज्ञानवंत व्हावे ज्ञानदेवा प्रमाणे...
ना रहावे झटत मजुरा प्रमाणे...
नव्या जगासोबत चालावे..
कधी ना मागे राहावे...
कौशल्य व्रूद्धी करून आपली...
थोपटावी पाठ मग आपणच आपली...
जगाला द्यावी नवी दिशा..
हीच आहे एक आशा..
कधी होणार हे स्वप्न साकार..
कोण देईल या मातीच्या गोळ्याला आकार..
व्यथा नाही ही कोणा एकट्याची...
आज गरज झाली आहे ती सर्वांची..
येईल एक दिवस तो क्षण...
जातील शाळेत सर्वजण...
आणि मग खूप दिवस शाळेत जर का नाही गेले कोणी पण..
मग शाळेला आठवत म्हणतील सर्व जण..
कितीतरी दिवसात नाही शाळेतही गेलो ...
कितीतरी दिवसात नाही अभ्यासात रमलो....