Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pandit Warade

Others

3  

Pandit Warade

Others

सय माहेरची येता

सय माहेरची येता

1 min
13.6K



सय माहेराची येता

मन पाखरू बनतं

एका क्षणात माहेरी

कसं जाऊन बसतं।।१।।


माझ्या माहेराची वाट

मऊ भासते पायाला

ओढ माहेराची लागे

होतं आतूर जायाला।।२।।


सय माहेराची येता

डोळ्यापुढं मायबाप

डोळे भरूनिया येई

झरू लागे आपोआप।।३।।


जरी सासर मायेचं

नाही कशाची उणीव

असे सोन्याचा पिंजरा

सदा असते जाणीव।।४।।


जाता चालत माहेरी

भासे पंढरीची वारी

माझ्या जीवाला वाटते

गोष्ट माहेरची न्यारी।।५।।


वारा माहेराचा येतो

गुज कानात सांगतो

वाट पाहते माऊली

जीव झुरणी लागतो।।६।।


भाऊराया पाहे माझी

वाट राखीच्या सणाला

कधी येशील म्हणतो

ताई माहेर पणाला।।७।


Rate this content
Log in