वसुंधरा माता
वसुंधरा माता
1 min
666
जन्मदात्री माता,
गोमाता, भूमाता
असे तीन माता
मानवाशी।।१।।
अन्न, पाणी, रत्ने
वस्त्र नि निवारा
देई वसुंधरा
मानवाशी।।२।।
वसुंधरा त्रास
उन्हाचा साहते
श्रावणात न्हाते
आनंदाने।।३।।
हिरवा सुंदर
शालू पांघरते
बीज अंकुरते
तिच्या गर्भी।।४।।
रोप रूप घेते
पीक तरारते
धान्य सज्ज होते
खाण्यासाठी।।५।।
मातीत जन्मणे
मातीतच जाणे
जगणे मरणे
तिच्या पोटी।।६।।
नागर, वख्खर
भूमी रक्ताळते
लाथाही साहते
प्रत्येकाच्या।।७।।
कीटकनाशके
रसायन खते
प्रदूषित होते
वसुंधरा।।८।।
प्रदूषण मुक्त
करू वसुंधरा
असो हाच नारा
माणसाचा।।९।।