Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Arun V Deshpande

Others

4  

Arun V Deshpande

Others

नयन

नयन

1 min
13.4K


 

नयनात तुझिया सखे

 मी मजला पहातो

चिमुकले जग तुझे माझे

त्यात दिसता जीव हा सुखावतो ।।

लढाईत या जगण्याच्या

सावलीसोबत तुझी असते

बळ येते लढण्यास मला जेंव्हा

नयनातून बोलक्या तुझ्या धीर देते।।

शांत तृप्त नयन तुझे

मज अथांग डोहासम भासती

व्यथा वेदनांचा मज विसर पडे

तुझी सुखद नजर मजवरी पडे।।

व्यक्त होण्यास कधी कधी

शब्द बोलके -ते ही तोकडे पडती

सस्मित नयनांनी तू मज बोलता

ओझे मनावरचे हलके हुकले होते।।

एक स्वप्न माझ्या मनीचे सखे

कुशीत असता मी तुझ्या पूर्ण व्हावे

नयनांशी  हितगुज करता करता

भावविश्व सारे भरुनी हे यावे।।

 

 


Rate this content
Log in