Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

अंतरात्मा...!

अंतरात्मा...!

1 min
335


अंतरात्मा म्हंटल की

लगेच अध्यात्माची गाडी

भरधाव वेगाने धावू लागते...


अगदी कागदावरून

धावऱ्या मुंगी सारखी

पटकन दुसरे स्टेशन गाठते...


एकदा असच झालं

जेंव्हा विचार चक्र

भरधाव वेगानं धावू लागलं...


माझं मनच मग

मला अपराध्या सारख

खाऊ लागलं...


कारण 

माझा आळसच

मला नडला होता...


पेनातल्या शाईने

पण आज

संप पुकारला होता...


कारण

शाईच आज पेनाच्या निबवर 

वाळून बसली होती..


अंतरातम्याची

तारच कोठेतरी

तुटली होती...


म्हणून

कागदानेही 

मान आज वळवली होती..


पण

इतकं खर

शाईन खूप काही शिकवलं

मौनंम सर्वार्थ साधनंम हे पटलं....!


Rate this content
Log in