Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Varsha Chopdar

Others

3  

Varsha Chopdar

Others

माझी कविता

माझी कविता

1 min
659




माझी कविता



माझी कविता

फुलांच्या सुगंधात दरवळणारी

झुळूक येता वाऱ्याची

जगण्याची मजा सांगणारी ---


माझी कविता

भावनांना स्पर्श करणारी

खोलवर रुजताना

परी उंची गाठणारी----


माझी कविता

बंध नाते जपणारी

मोरपीस फिरवोनी

वीण घट्ट करणारी ----


माझी कविता

विविधता जपणारी

रचनेत रमताना

प्रबोधन करणारी ----


माझी कविता

विविध रूपे उलगडणारी

शब्द चपखल येता

एकरूप 'ती ' होणारी -----


माझी कविता

प्रेमालाही प्रेमात पाडणारी

स्व:ची जाणीव करून देऊनी

माझी ओळख सांगणारी----



Rate this content
Log in