रक्षाबंधन ( दशाक्षरी)
रक्षाबंधन ( दशाक्षरी)
1 min
14.5K
भाऊ बहिणीचा आनंदाचा
रक्षाबंधनाचा सण आला
नाही आनंदाला पारावार
राखीचा प्रेम धागा बांधते
बहीण भावाच्या हातावर
धागा पवित्र हा रेशमाचा
गुंफतो नाते पवित्रतेचे
बहीण ओवाळते भावाला
त्याच्या वृत्ती, दृष्टीचे रक्षण
सुख शांती मागते देवाला
महिला भोगदासी नसावी
नेहमी पुजनीय मानावी
संदेश हाच रक्षाबंधनाचा
पवित्रता जपाया मन्त्र हा
मानवतेच्याच कल्याणाचा