स्वतंत्र नारी
स्वतंत्र नारी
1 min
371
स्वतंत्र नारी
विश्र्व उभारी
स्व कतृत्वाने
घेई भरारी
स्वप्नांची आस
नित्य तो ध्यास
झळकतो हा
आत्मविश्वास
कर्तव्यदक्ष
असे चाणाक्ष
धारदार हा
तिचा कटाक्ष
किर्ती अफाट
चालते वाट
यशोगाथा ती
तुझी विराट
तेज लोचनी
भाव तो मनी
सांगेल तुझी
सारी कहाणी