कविता - आठवणी
कविता - आठवणी
1 min
1.4K
आवडत्या माणसांच्या आठवणी
ठेवाव्यात मनाच्या पुस्तकात
खुणा असतात त्यांच्याच
पानापानागाणिक ..!
केंव्हाही वाचावं मनातल्या मनात
आपलं आवडत माणूस
त्याच्या आठवणीसकट...
बिनबोभाट ..!