Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

गुरुचे महत्व

गुरुचे महत्व

1 min
414


उपदेश बहूमोलाचा

चार ओळीतून मिळाला

चैतन्याचा मागोवा घेताना

मला कृपा प्रसाद लाभला


मरगळल्या जीवाला

स्फुर्ती स्पर्श झाला

जणू गंजल्यासी

आपसूक परिसस्पर्श झाला


योजना आखण्या

अगोदरच बेभान झालो

पुरेशी ऊर्जा घेऊनि

मी गुरूपद स्पर्श करुनी आलो


मज हवे ते मिळाले

गुरूदर्शनाने समाधान लाभले

आशीर्वादात गुरूच्या

जीवन भरून पावले


पाऊल एक पुन्हा

जोशात पुढे पडले

जीवनात पुन्हा एकदा

प्रयत्नाशी नाते जडले


गुरुचे महत्व

हरघडीस जाणवते

प्रत्येक क्षणी ते

सदैव उपयोगी पडते


Rate this content
Log in