मला पडलेली स्वप्ने
मला पडलेली स्वप्ने
दिनांक 10-12-22
स्थळ टिटवाळा
एक मुलगी अशी गोंडस माझ्या खांद्यावर खेळत होती तिला घेऊन मी माझ्या कामाच्या ठिकाणी गेलो होतो तिथे असलेली महिला अधिकारी मला म्हणाली तुम्हाला ही मुलगी छान शोभून दिसते अशीच घेऊन यायला अधून मधून तुमची काम पण होतील आणि तुमचं मुलीला खेळवणं पण होईल. मी तर मुलीकडे पाहिले तर ती मुलगी खूपच छान दिसत होती. माझ्या अंगावर खेळत होती. रडत अजिबात नव्हती. त्या मुलीला घेऊन मी नंतर घरी निघालो.
