STORYMIRROR

CHANDRAKANT PAWAR

Fantasy Others

3  

CHANDRAKANT PAWAR

Fantasy Others

मला पडलेली स्वप्न

मला पडलेली स्वप्न

2 mins
211

दिनांक 11 -12- 22

स्थळ टिटवाळा

मी एका बस मधून जात होतो ज्या ठिकाणी मला जायचं होतं त्या ठिकाणची मी भाडे दिले. बस सुरू झाली. बस अर्ध्यावर आली आणि कंडक्टरने ड्रायव्हरला सांगून ती बस मागे वळवली. आम्हाला वाटलं की दुसऱ्या मार्गाने जाईल. परंतु तसं काही झालं नाही ती बस ज्या मार्गावर आली होती त्या मार्गाने पुन्हा माघारी निघाली होती. ते बघून मी त्यांना म्हटलं माझं उतरण्याचे ठिकाण पुढे आहे तुम्ही मागे का आले.

कंडक्टर म्हणाला मी आधीच सांगितले होते ही बस एवढ्याच अंतरावर जाईल तुम्हाला ऐकू आलं नाही का.

मला ऐकू आलं की नाही हा प्रश्न नाहीये पण तुम्ही भाडं तर माझं पुढच्या स्टॉप घेतलेला आहे.

मला तुमचं काय ऐकायचं नाही इथून उतरा.

मी निमूटपणे बस मधून खाली उतरलो. बस निघून गेली.


स्वप्न दुसरे 2


पहिल्या स्वप्नानंतर दुसरं स्वप्न लगेच पडलं मला.

एका गार्डन मध्ये गेलो होतो मी. तिथे एका स्टॅन्ड ला एक कसलीतरी मशीन अडकवलेली होती. ती मी माझ्यासोबत असलेल्या एका मुलाला काढायला सांगितली. त्याने काढून दिल्यावर ती माझ्या बॅगेत ठेवली.

त्या मुलाने मला म्हटले हे मशीन तुम्ही चोरता आहे काय.

मी म्हणालो नाही. ज्यांना ं मशीन लागते त्याने इथून ती घेऊन जावी इथून ती फ्री मिळते आपण पुन्हा आणून तिथे ठेवायची.


स्वप्न तिसरे 3


मी जिथे काम करत होतो तिथे मला बोलावण्यात आलं होतं मी तिकडे गेलो तर मनामध्ये तुम्ही जे काम केलं होतं ते चुकीचे काम केलेला आहे या नावाचा माणूस तिथे नाहीये आम्ही जाऊन चेक केलं तुम्ही कोणतं काम केलं आहे.

मी म्हणालो मी बरोबर काम केलं तुम्हाला काहीतरी चुकीची माहिती मिळाली आहे.

तर अधिकारी म्हणाले आम्ही फिल्ड वर गेलो होतो तिकडे आम्ही चौकशी केली तर या नावाची व्यक्ती तिथे नाहीच आहे परंतु तुमच्या पुस्तकांमध्ये या नावाची व्यक्तीची नोंद आहे हे कसं काय.

ते ऐकताच माझी बोबडी वळाली. मी त्या प्रश्नाला कसे उत्तर द्यायचं याचा विचार करीत राहिलो.

मी त्यांना म्हणालो की तुम्हाला काहीतरी माहिती मिळाली असेल परंतु सध्या मी रिटायर झालो आहे.

तेव्हा तो अधिकारी म्हणाला ठीक आहे बसा इथे...

त्यानंतर त्या अधिकाऱ्याने दुसऱ्या कर्मचाऱ्याला त्याच्या कामाबद्दल विचारायला सुरुवात केली.


याच कामाच्या बद्दल....

 माझ्या वरीष्ठ अधिकाऱ्याने मला सांगितले.

 तुला कसली एक नोटीस आली का.

मी म्हटलं. नाही..

तेव्हा तो वरिष्ठ अधिकारी गालात हसला आणि म्हणाला.

 अरे अमुक जागी त्या ठिकाणी तु गेला होतास

 सर्वे करायला. तर तिथलं जी माहिती आहे .ती चुकीची तु दिलेली आहेस. त्याबद्दल तुला नोटीस आलेली आहे.

मी म्हणालो. नाही .तसं काही मला कोणी नोटीस वगैरे दिलेली नाही.

ठीक आहे समजेल तुला. एवढं बोलून ते स्वप्न संपले.

अशी एका पाठोपाठ एक तीन स्वप्ने मला एका दिवसात पडली


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Fantasy