माळरानावरील वेडा वृद्ध (कथा)
माळरानावरील वेडा वृद्ध (कथा)
फार पुरातन काळाची गोष्ट.एकदा एका रानमाळावरील शेतात वृद्ध महातारा व्यक्ती रोज दिवस-रात्र त्या बांधावर बिया जमिनीमध्ये रुजवत आणि त्यांना पाणी देत असे. असा त्याचा दिनक्रम रोज चालायचं .गावातील माणसे हा सर्व प्रकार पाहून त्या वृद्ध म्हाताऱ्याला वेडा मनुष्य म्हणून सोडून दिले होते . परंतु एके दिवशी गावातील मुलांची झुंबड खेळण्यासाठी त्या टेकड्यांवरील रानमाळावर गेली. मुलांनी ज्या ठिकाणी त्या वृद्ध म्हातारा यांनी झाडांच्या बियांची लागवड केलेली होती . त्या ठिकाणी खेळणे सुरु केले त्यावर तो म्हातारा या मुलांना खेळू देत नव्हता .शेवटी मुलांनी गावातील सरपंच पोलीस पाटील व इतर जणांना बोलावून आणले.
मुलांच्या सांगण्यावरून या म्हातार्याला धडा शिकवण्यासाठी सर्व वयस्क मंडळी माळरानावर गेली. म्हातारा झोपडीत गाढ झोपलेला होता. काहीजणांनी त्याला दगड धोंडे मारून बाहेर आणले. आणि सरपंच समोर उभे केले. त्यावर सरपंच म्हणाले ...काय रे म्हाताऱ्या काय? मुलांना तू खेळू देत नाही ?तुझ्या बापाची जागा आहे काय ?अरे पडीत पडलेल्या माळराण जमीनीला स्वतःची मालकी समजतं का ?
आपली झोपडी उचल आणि चलता हो. म्हाताऱ्याने ..पोलीस पाटील, सरपंच आणि गावकऱ्यांना पाया पडून सारखी विनवणी केली ....अहो मला हे काम करू द्या .हे तुमच्याच कल्याणासाठी होत आहे .त्यावर सरपंच म्हणाला... हे मला तू शिकविते काय?आमच्या मुलांचे खेळणे बंद करून आंम्हाला कल्याण शिकविते . तू आंमचे कोणते कल्याण करणार. पागल झालेला आहे. वेडा आहे .रोज जमीन उखरत बसते. आणि काहीतरी करत असते तू इथून चालता हो .तेव्हा म्हातारा म्हणाला.... सरपंच साहेब, मी या जमिनीत वेगवेगळ्या वृक्षांचे बीच पेरलेले आहेत .ते वृक्ष उगवतील त्यांचा फायदा तुम्हालाच होईल .आज तुम्हाला नाही तरी, या खेळणाऱ्या चिमुकल्या मुलांच्या पिढीला नक्कीच होणार ...हे फळं ते वृक्ष ती सावली त्या वर बसणारे पक्षी हे सर्व काही आणि पडणार्या धो धो पाऊस हे सर्व या पेरलेल्या बीजातून उगवणाऱ्या वृक्षापासून तुम्हाला अवश्य मिळणार.
तुम्ही मला समजून घ्या त्यावर पोलीस पाटील म्हणाले.... हे मा- ताऱ्या तू इतका हुशार झाला की, आम्हाला ज्ञान शिकवत चालला... तुझ्या सारखे आम्ही कितीतरी हुशार तरुण पाहिलेले आहे ..तू इथून चालता हो. त्याला मारझोड करून गावाच्या वेशी बाहेर काढण्यात आले. काही दिवसांनी पाऊस आला माळरानावर वृक्षांच्या रोपट्यांचया रांगा दिसायला लागल्या .एके दिवशी मुले खेळण्यासाठी रानमाळावर गेली. सर्व जमिनीवर वृक्षांची छान टवटवीत रोपे दिसत होते.ते बघून मुले गावात सांगायला आली. ते म्हणाले ...बघा त्या रानमाळावर खूप छान बाग , सुंदर असे रोपटे दिसत आहे .सर्व गाव रानमळा कडे धाव घ्यायला लागले. रानमळा वर जाताच गाव चकित झाले. आणि सरपंच हुशार होता. त्यांनी सांगितले ...गावकऱ्यांना बघा मागील पंधरवड्यात मी हे सर्व माझ्या कामगाराकडून करून घेतले .
हे सर्व काम मीच केलेले आहे, असे त्यांनी गावकऱ्यांना पटवून दिले आणि सामाजिक वनीकरण विभागाकडे माहिती देऊन ग्रामपंचायत ला मोठे बक्षीस आणि स्वतःचा सन्मान त्या सरपंचाने करून घेतला. दिवसामागे दिवस गेली परंतु हे सर्व कोणामुळे घडले हे कोणालाच कळले नव्हते ,पण त्या खेळणाऱ्या लहान मुलांच्या चमू मध्ये एक 'कल्पित' नावाचा मुलगा होता. त्याच्या लक्षात त्यावेळेस आले होती की, हा वृद्ध म्हातारा बीजाचे रोपण करते. तेच वृक्ष पुढे मोठे होणार आहेत. परंतु तो एका गरीब कुटुंबात जन्माला आलेला होता त्याचं कोण ऐकणार .त्यामुळे त्यांने हे विचार कधीच कोणाला समजावून सांगितले नाही.
परंतु आता तो मोठा झाला मॅट्रिक पास झाला .आणि एका कंपनीत नोकरी करायला लागला. त्या कंपनीत कंपनी नुसार वृक्षाची लागवड आणि संवर्धन हे कंपनीचे सूचक होते. हे त्याला सर्व कळत होतं. तो गावात आला आणि त्याने ग्रामपंचायत मध्ये एक सभा घेतली. त्यात तो बोलायला लागला की,.. हे जे रानमाळावर फुललेल्या वृक्षाच्या रांगाआहे ,ते केवळ त्या म्हाताऱ्या आजोबा मुळेच ..त्यांनी जर हे वृक्ष लावले नसते तर आज हे रानमाळ फुललेल्या बागेत नसते .त्यांनी केलेल्या या बीज रोपणातून हे वृक्ष आज आपल्या डोळयाने दिसत आहे.आमची पीढी प्रत्क्षात पाहत आहे. हे कुणामुळे त्या आजोबां मुळे. पर्यावरणाचा संरक्षण झाले आणि एवढेच नव्हे तर आज आमच्यासारख्या पिढीला नवनवीन वृक्ष क्ष पाहायला मिळत आहे. त्यांची फळे चाखायला मिळतात. एवढंच नव्हे तर आज त्यांच्या वृक्षा यामुळे पावसाचे प्रमाण सुद्धा या ठिकाणी खूप प्रमाणात होत आहे. ही सर्व पुण्याई त्या वृद्ध म्हातारा म्हणजेच त्या आजोबांची आणि आम्ही मात्र त्यांना विसरलो आणि गावाच्या वेशी बाहेर काढून दिलं .जर त्यांनी ही वृक्षलागवड केली नसती तर, हे रान फुलल्या गेले नसते. हे सुंदर पर्यावरण आपल्या डोळ्याने दिसले नसते. ही सुंदर बाग दिसली नसती .आणि आपल्या गावाला ग्रामपंचायतीला हा पुरस्कार प्राप्त झाला नसता .
याचे सर्व श्रेय केवळ आणि केवळ त्या म्हाताऱ्या वृद्ध माणसाला द्यायला हवे. परंतु त्यांना सर्रास डावलून हा सन्मान सरपंच साहेबांनी घेतला. हे योग्य नाही. आज आपण यातून एकच शिकायला हवे की आपल्या पृथ्वीवर कमीत कमी प्रत्येकाने एखाद्याच्या वाढदिवसाला किंवा एखाद्या समारंभाला किंवा एखाद्या पुण्यतिथी जयंती ला अनुसरून एक तरी रोपटे लावावे आणि ते येणाऱ्या पिढीसाठी लाभदायक ठरू शकते. हे मात्र निश्चित एवढेच या ठिकाणी त्या वृद्ध म्हाताऱ्यांनी आपल्याला दिलेली शिकवण आहे. ही शिकवण म्हणजे पर्यावरणाचे प्रदूषण होण्यापासून संरक्षण करण्यासाठी वृक्ष लावा वृक्ष जगवा होय.
अर्थात खऱ्या कामाची पावती उशीरा का होईना पण ती मिळते.एवढे मात्र खरे..
